सुरक्षा दलाच्या जवानांनी केला दोन दहशतवाद्यांचा खात्मा


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू काश्मीर येथील कुपवाडा भागातील हंडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक झाली. यात लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षादलाला यश आहे.
 एकूण तीन दहशतवादी   होते असे सांगण्यात येते. एएनआय या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. सध्या गोळीबार थांबला असून शोध मोहीम सुरु करण्यात आली आहे.पाकिस्तानवर भारताने एअर स्ट्राईक केल्यापासून पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायाच सुरुच आहेत. एकीकडे चर्चा करायची आहे, शांततेने प्रश्न सोडवू, दहशतवादाशी लढा देऊ असं म्हणायचं आणि दुसरीकडे कुरापती काढायच्या हे प्रकार सुरुच आहेत. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधले संबंध पुलवामा येथील हल्ल्यानंतर तणावपूर्ण झाले आहेत. अशात आता दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.  Print


News - World | Posted : 2019-03-01


Related Photos