महत्वाच्या बातम्या

 सेवानिवृत्ती कर्मचारी व कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेट पास रद्द करुण स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना संधी देण्याची राजु झोडे यांची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : सी. एस. टी. पी. एस. महाजनको मध्ये कित्येक कर्मचारी व कंत्राटी कामगार सेवानिवृत्त झालेले आहेत. परंतु सेवानिवृत्त झाल्यानंतर ही त्यांना कामावर ठेवून स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर मोठा अन्याय होत आहे. ठेकेदार सेवानिवृत्त झालेल्यांनाच कामावर घेत असल्यामुळे येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार यांच्यावर जीवन कसे जगायचे असा प्रश्न पडलेला आहे. याबाबत उलगुलान संघटनाचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांनी मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन स्थानिकांना रोजगार देण्याची मागणी केली.

मागील काही वर्षापासून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचेकडूनच ठेकेदार काम करून घेत आहेत. त्यामुळे येथील स्थानिकांना रोजगाराचा मोठा प्रश्न पडलेला आहे. जुनेच कामगार असल्यामुळे सुशिक्षित युवक बेरोजगारांना कामाची संधी उपलब्ध नसल्यामुळे येथील बेरोजगार युवक हाताश झालेला आहे. सी. टी. पी. एस. प्रशासनाने तात्काळ सेवानिवृत्त कर्मचारी व कंत्राटी कामगार यांचा गेट पास रद्द करून येथील स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची व कामाची संधी उपलब्ध करून द्यावी या मागणीसाठी उलगुलान विद्युत कामगार संघटनेकडून मुख्य अभियंता यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली. सी. टी. पी. एस. प्रशासनाने याची दखल घेतली नाही तर याबाबत येथील स्थानिक युवक बेरोजगार या विरोधात आक्रमक पवित्रा घेऊन तीव्र आंदोलन करणार असा इशारा सीटीपीएस प्रशासनाला राजू झोडे यांनी दिला. निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, दुर्गापुर शाखा अध्यक्ष रवी पवार , गुरु भगत तथा संघटनेचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos