महत्वाच्या बातम्या

 अवैधरीत्या शस्त्र बाळगणान्या आरोपीला अटक : स्थानिक गुन्हे शाखा, नागपुर ग्रामीण ची कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : १५ जून २०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे कन्हान उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय मुखबिरकडुन माहिती मिळाली की एक इसम पोलीस स्टेशन कन्हान हद्दीत अवैधरीत्या अग्नीशा बाळगून काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने फिरत असलेल्या रामटेक येथे राहणारा आरोपी राहुल भारत फुलझेले वय २५ वर्ष, रा. रामटेक हा आपले जवळ देशी कट्टा बाळगून अप्रीय घटना करण्याचे उद्देशाने डुबरी बस स्टॉप येथे बसून आहे, अशा मिळालेल्या खबरेवरून आरोपीस पकडले असता त्याला ताब्यात घेऊन पंचा समय त्यांची घेतली असता त्याचे अंगझडतीत एक लोखंडी देशी कट्टा किमती अंदाजे ३०,०००/-रु. एक जिवन कारतुस किमती अंदाजे १००० /- रु. मिळून आला. 

सदर हत्यारा बाबत आरोपीला परवाना विचारला असता त्याच्या जवळ कोणत्याही प्रकारचे कागदपत्रे मिळुन आले नाही. आरोपीला जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कार्यवाही करीता पोलॉस ठाणे कन्हान यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही नागपुर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, पोलीस हवालदार, नाना राऊत, इकबाल शेख, पोलीस नायक वीक नरड, मोनू शुक्ला, पोलीस शिपाई अभिषेक देखमुख यांचे पथकाने केली.






  Print






News - Nagpur




Related Photos