महत्वाच्या बातम्या

 लखपती दिदी म्हणून मुरूमगाव येथील घरकुल लाभार्थी महिलांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : मोदी-9 महा जनसंपर्क अभियानाअंतर्गत पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मिळालेल्या महिलांचा लखपती दिदी म्हणून सत्कार करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मिळालेल्या महिलांचा भाजप महिला आघाडी जिल्हा गडचिरोलीच्या वतीने जिल्हा प्रभारी तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या नेतृत्वात लखपती दिदी म्हणून सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर झालेल्या मुरूमगाव येथील बिसमतबाई बुधराम कोलियारा व सुभागा पंचम कोलियारा या महिलांचा लखपती दिदी म्हणून महिला आघाडी च्या जिल्हा प्रभारी योगीता पिपरे, जिल्हा सचिव प्रतिभा चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजप महिला आघाडी धानोराच्या तालुका अध्यक्ष लता पुंघाटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गडचिरोली शहर महामंत्री रश्मी बाणमारे, शहर उपाध्यक्ष कोमल बारसागडे, शहर उपाध्यक्ष ज्योती बागडे, मिनाक्षी मेश्राम, उर्मिला नैताम उषा आचलावार, छाया रामटेके, फुलबाशन मारगिया, रसिका पदा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


याप्रसंगी जिल्हा प्रभारी योगीता पिपरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात केलेले चांगले कार्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजनांची व महिलांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos