महत्वाच्या बातम्या

 महाज्योतीच्या विद्यार्थ्यांचे एमएचटी सीईटी परीक्षेत घवघवीत यश


- १०१ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांवर परसेंटाईल स्कोअर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषि अभ्यासक्रम प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने नुकताच घोषीत केला. यात महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (महाज्योती) घेण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी प्रशिक्षण योजनेतील 101 विद्यार्थी 90 टक्क्यांवर परसेंटाईल स्कोअर घेऊन उत्तीर्ण झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या या यशाचे श्रेय महाज्योतीला दिलेले आहे.
एमबीए, एमसीए, बी.आर्च., कृषी यासह अभियांत्रिकी आणि फार्मसी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेचे प्रशिक्षण महाज्योतीमार्फत मोफत देण्यात येते. या प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी टॅब तसेच इंटरनेट डाटा पुरविला जातो. अभ्यासासाठी आवश्यक पुस्तकाचा संच घरपोच दिल्या जातो. तज्ञ प्रशिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केल्या जाते.


महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी या प्रशिक्षण योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos