महत्वाच्या बातम्या

 नागपूर-पंढरपूर आषाढी विशेष रेल्वे गाडीला रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील : खासदार रामदास तडस यांच्या प्रयत्नांना यश


- वर्धा येथून थेट पंढरपूरला जाण्याकरिता चार दिवस व परतीच्या प्रवासाला चार दिवस विशेष रेल्वे धावणार

- वर्धा लोकसभा क्षेत्रात वर्धा, पुलगांव, धामणगांव व चांदूर रेल्वेस्थानकावर आषाढी विशेष गाडी थांबणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वारकरी भक्तांना व प्रवासी वर्गाला आषाढी एकादशी निमीत्य थेट विठ्ठलाच्या दर्शनाकरिता पंढरपूरला वर्धा येथून विशेष रेल्वे सेवा मिळावी याकरिता वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांच्या मागणी केली होती, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असुन गाडी संख्या 01205/01206 नागपूर ते मिरज व गाडी संख्या 01207/01208 नागपूर ते पंढरपूर चार दिवस जाणे व चार दिवस परतीच्या प्रवासाकरिता विशेष रेल्वे सेवा दिनांक 25 जुन  2023 पासुन प्रारंभ होणार आहे.

चार दिवस जाणे व चार दिवस परतीच्या प्रवासाकरिता विशेष रेल्वे सेवा प्रारंभ करण्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविला असुन याबाबत दिनांक 16 जुन 2023 रोजी आदेश निर्गमीत झाले असुन गाडी संख्या 01205/01206 नागपूर ते मिरज व गाडी संख्या 01207/01208 नागपूर ते पंढरपूर विशेष रेल्वे निघणार आहे. दिनांक 25, 26, 28, 29 जुन ला सकाळी 10.00 वर्धा येथून पंढरपूर व परतीकरिता 27, 28, 30 जुन व 01 जुलै रोजी परतीकरिता पंढरपूर वरुन थेट वर्धेकरिता विशेष रेल्वेचे चलन होणार असुन वर्धा लोकसभा क्षेत्रातील वर्धा, पुलगांव, धामणगांव व चांदूर रेल्वे येथे या गाडी थांबणार असल्याची माहिती खासदार रामदास तडस यांनी दिली.

वारकरी भक्ताकरिता गाडी संख्या 01205/01206 नागपूर ते मिरज व गाडी संख्या 01207/01208 नागपूर ते पंढरपूर विशेष रेल्वे सुरु झाल्यामुळे वारकरी भक्तांना व प्रवासी वर्गाला दिलासा मिळाला आहे, वारकरी भक्त आरामदायी प्रवासाने आपली यात्रा पुर्ण करतील याचे आम्हा सर्वांना समाधान आहे, वारकरी भक्ताचे व प्रवासी वर्गाचे खासदार रामदास तडस यांनी अभिनंदन केले व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, केन्द्रीय मंत्री नितीनगडकरी व उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या प्रती आभार व्यक्त केले.





  Print






News - Wardha




Related Photos