विधिमंडळ अधिवेशन घेतलं आटोपतं : सुरक्षेच्या कारणास्तव एकमताने घेतला निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
पाकिस्तानबरोबरील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव  सुरू असलेल्या विधिमंडळाचे अधिवेशन आटोपतं घेतलं आहे.  सर्वपक्षीय गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय झाला. थोड्याचवेळात याची घोषणा केली जाईल. दरम्यान, या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे.  
सध्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बुधवारी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यातच सुरक्षा आढावा बैठकीत अधिवेशन संपवण्याबाबत चर्चा झाली होती. अधिवेशन काळात सर्व मंत्रिमंडळ आणि राज्यभरातील आमदार विधानभवन परिसरात असतात. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर याचा ताण येतो. सर्वच महत्वाचे व्यक्ती येथे असल्याने हा परिसर जास्त संवेदशनशील असतो.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अधिवेशन आटोपते घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचा हा पळपुटेपणा असल्याचा आरोप केला. एकीकडे मोदी देशभरात फिरतात, सभा घेतात. त्यांना संरक्षण लागत नाही का, असा सवाल करत हे नाटक बंद करा. आपला विंग कमांडर पाकिस्तानात आहे आणि आपण पळपुटेपणा करत आहोत, असे त्यांनी म्हटले.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-28


Related Photos