महत्वाच्या बातम्या

 जीपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार : देसाईगंज शहराच्या कुरखेडा मार्गावरील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

शहर प्रतिनिधी / देसाईगंज : देसाईगंज शहराच्या कुरखेडा मार्गावरील एका राईस मिल धरमकाट्यासमोर मालवाहू जीपने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर मागील सीटवर बसलेला किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवार १५ जून रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान जीपसह चालक पसार झाला.

हिराकांत नेवारे, असे अपघातात जागीच ठार झालेल्या वाहनचालकाचे नाव आहे, रवी कांबळी यांच्या उजव्या पायाच्या मांडीचे हाड तुटला. नेवारे व कांबळी हे दोघेही विसोरा येथील रहिवासी आहेत. रवी यांच्या जखमेतून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. देसाईगंज वरून कुरखेडाकडे भरधाव मालवाहू जीप जात होते. याच पायाच्या मांडीचे हाड तुटला. नेवारे व कांबळी हे दोघेही विसोरा येथील रहिवासी आहेत. रवी यांच्या जखमेतून अधिक रक्तस्राव झाल्याने त्यांना नागपूर येथे उपचारासाठी हलविण्यात आले. देसाईगंज वरून कुरखेडाकडे भरधाव मालवाहू जीप जात होते. याच वेळी दुपारी २ वाजताच्या सुमारास विसोऱ्यावरून एमएच-३३ के ०२३५ या दुचाकीने नेवारे व कांबळी हे देसाईगंजकडे येत होते. दरम्यान भरधाव मालवाहू जीपने दुचाकीला जबर धडक दिली. यात हिराकांत नेवारेच्या डोक्याला जबर मार लागून डोके फुटले. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर मागे बसलेल्या रवी कांबळी याच्या उजव्या पायाच्या मांडीचा हाड तुटल्याने भरपूर रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्यांना नागपूर येथे उपचारार्थ हलविण्यात आले. माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. आता पोलिस जीपसह चालकाचा शोध घेत आहेत.





  Print






News - Gadchiroli




Related Photos