भरधाव ट्रक ने घेतला अचानक पेट : कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक


- वर्धा जिल्ह्यातील घटना 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
तळेगाव (शा.पं.) येथील सत्याग्रही घाटात कांदा घेऊन जात असलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. यात ट्रकमधील कांद्याच्या ३५० गोण्या जळून खाक झाल्याची घटना बुधवारी सकाळी १० च्या सुमारास घडली .
चाळीसगावचे येथील नामदेव सोममिरे या शेतकऱ्याच्या ३५० कांद्याच्या गोण्या घेऊन जात असलेल्या ट्रकला सत्याग्राही घाटात अचानक आग लागली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने ट्रक थांबवून अन्य शेतकऱ्यांना सूचना दिली. याबाबत तळेगाव पोलिस ठाण्याला माहिती देऊन अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन येईपर्यंत ट्रकची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली होती. मात्र अद्याप आगीचे कारण समजू शकले नाही.  Print


News - Wardha | Posted : 2019-02-27


Related Photos