कार व मालवाहू कंटेरनची धडक : चौघांचा जागीच मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / औरंगाबाद :
कार व मालवाहू कंटेरनची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चौघाचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी असल्याची घटना नागपूर - मुंबई महामार्गावरील भग्गाव शिवारात सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली आहे . 
मृतांमध्ये चिकलठाणा येथील रहिवासी व संत भगवानबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अध्यक्ष मदन रोघोजी ढाकणे (४५), औरंगाबादेत रामनगर भागातील रहिवासी व भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा सविता विलास घुले (४०), त्यांचे पती विलास पंढरीनाथ घुले (४५) व चालक दिनेश बाजीराव बकाल यांचा समोवश आहे. मदन यांच्या पत्नी मीरा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  ढाकणे यांच्या संत ज्ञानेश्वर अकादमीची नवी वास्तू उभी आहे. त्याच्या उदघाटनासाठी  ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे यांना आमंत्रित करण्यासाठी ढाकणे दाम्पत्य व घुले दाम्पत्य रविवारी रात्री कारने मुंबईला गेले होते. औरंगाबादकडे परतताना वैजापूरजवळ भग्गाव शिवारात रात्री साडेअकराच्या दरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनगरने कारला समोरून धडक दिली. या भीषण धडकेत कारचा पूर्ण चुराडा झाला.  Print


News - Rajy | Posted : 2019-02-27


Related Photos