सोमनपूर येथील बोरवेल बंद, दुर्गापूर ग्रामपंचायतीला ठोकले कुलूप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेंढरी :
धानोरा तालुक्यातील दुर्गापूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोमनपूर येथील बोरवेल मागील दोन ते तीन महिन्यांपासून बंद आहे. याबाबत ग्रामपंचायतीला माहिती देवूनही दुरूस्ती करण्यात आली नाही. यामुळे संतप्त नागरीकांनी ग्रामपंचायतीलाच कुलूप ठोकले आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून बोरवेल बंद असल्यामुळे महिलांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. असे असूनही ग्रामपंचायत प्रशासन दूर्लक्ष करीत आहे. ग्रामसेवकाने धानोरा पंचायत समितीच्या तांत्रिक विभागाकडे बोरवेलची रक्कम न भरल्यामुळे अद्याप बोरवेलची दुरूस्ती करण्यात आली नाही. मात्र ग्रामसेवक नागरीकांची दिशाभूल करीत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-26


Related Photos