पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारताचा दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक


वृत्तसंस्था / नवी दिल्ली :   पाकिस्तानच्या हद्दीत घुसून भारतीय लष्कराने दहशतवादी तळांवर पहाटे ३.३०  वाजण्याच्या सुमारास  एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. या हल्ल्यातील पाकिस्तानमधील बहुतांशी दहशवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहेत. मिराज फायटर २००० जेटच्या सहाय्याने हा हल्ला करण्यात आला आहे. 
पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. तसेच पाकिस्तानी विमानांनी भारताच्या विमानांना पळवून लावल्याचा दावाही केला आहे. मात्र, हा दावा करताना त्यांच्याकडून भारताने केलेल्या हवाई हल्ल्याचे काही फोटोही शेअर करण्यात आले आहेत. सध्या, सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. तसेच या हल्ल्याची बातमी येताच ट्विटरवर Air Strike नावाचा ट्रेंड सुरू झाला आहे. पुलवामा येथील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला भारतानं सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलाच्या विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तीन तळ उद्ध्वस्त केले आहेत. पाकिस्ताननं मात्र भारताचा हल्ला परतवून लावल्याचं म्हटलं आहे.   Print


News - World | Posted : 2019-02-26


Related Photos