आलापल्ली येथे २.२० कोटी रुपयांच्या निधीतून बनणार हायटेक बसस्थानक


- आलापल्ली येथील बसस्थानकाच्या प्रस्तावित जागेची पालकमंत्र्यांनी केली पाहणी 
-  लवकरच होणार भूमिपूजन  , २५ वर्षांची मागणी अखेर  ना. आत्राम यांनी केली पूर्ण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  अहेरी :
  आलापल्ली येथे नवीन हायटेक बस स्थानकाला मंजुरी मिळाली असून त्यासाठी शासनाने २.२० कोटी रुपयांची निधी मंजूर केली आहे.  लवकरच  बसस्थानकाचे  भूमिपूजन  होणार असल्याने, गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना.राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांनी काल नवीन हायटेक बस स्थानकाच्या प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली व  माहिती जाणून घेतली. 
  आलापल्ली हे गाव अहेरी विधानसभा क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण आहे. येथूनच पाचही तालुका मुख्यालयाला रस्ते जात असल्याने  गावात नेहमीच लोकांची गर्दी असते.  परंतु सुसज्ज बस स्थानक नसल्याने लोकांना रस्त्यावर उभे राहून बस ची वाट पहावी लागते.  त्यामुळे प्रवाशांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागत आहे.   ही बाब लक्षात घेत  आलापल्ली येथे सर्वंसोईयुक्त बस स्थानक व्हावे अशी लोकांची गेल्या २५ वर्षांपासून मागणी होती, ह्या पुर्वीच्या मंत्री व आमदारांकडे ह्या विषयाची वारंवार लोकांनी मागणी करूनही ही मागणी शेवटपर्यंत पूर्ण झाली नाही.
 २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत  ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आमदार म्हणून निवडून आल्यास आपण आलापल्ली येथे सुसज्ज बस स्थानक मंजूर करून देऊ असा शब्द  जनतेला दिला होता.  गेल्या ४ वर्षात पालकमंत्री ना. राजे  आत्राम यांनी सातत्याने पाठपुरावा करून येथील बसस्थानकाच्या जागेचा प्रश्न सोडवुन,२.२० कोटी निधीतून सर्वसुविधायुक्त हायटेक बस स्थानक मंजूर करवून येतील जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. 
 आलापल्ली येते २.२० कोटी निधीतून होणाऱ्या हायटेक बस स्थानकाची निविदा प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली असून लवकरच ह्या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री  ना. राजे  आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे.  लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, गेल्या २५ वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने आलापल्ली येथील जनतेमध्ये सद्या आनंदाचे वातावरण आहे. 
जागेची पाहणी करताना जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती मधुरीताई उरेते, अहेरीच्या नगराध्यक्षा हर्षाताई ठाकरे, भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष अमोल गुडेल्लीवार, भाजपा आलापल्ली शहराध्यक्ष नागेश रेड्डी, अहेरी शहराध्यक्ष मुकेश नामेवार, सागर डेकाटे, फिरोज शेख , गुड्डू ठाकरे, संजय अलोने, विनोद ठाकरे, सचिन करमे सह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-25


Related Photos