महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूर : नगर परिषद च्या संगनमताने कर्मचाऱ्यांचा शोषण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर नगरपरिषदे चे अधिकारी आणि भारत इंटेलिजेंस सिक्योरिटी फोर्स संगनमताने नगर परिषद मध्ये आउटसोर्सिंगचे काम करणारे कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहे, अशा आरोप भाजपा कामगार मोर्चा चे प्रदेश सरचिटनिस अजय दुबे यांनी केला आहे. सुधीर मुनगंटीवार, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री, पालकमंत्री चंद्रपूर, जिल्हा सहाय्यक श्रम आयुक्त चंद्रपुर आणि मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांना सादर केलेल्या निवेदनात कर्मचार्‍यांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी केलेली आहे. वरील एजन्सीला शासनाकडून 22 हजार मिळून ही केवळ सहा ते सात हजार रुपये कर्मचाऱ्यांना दिले जातात. नियमाविरुद्ध सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून 12 तास ड्युटी घेऊन केवळ 6 हजार रू., कॉम्प्युटर आपरेटर्स आणि इतर ठिकाणी काम करणाऱ्यांना फक्त 7 हज़ार रु.दिले जातात. पीएफ ही नियमित भरला जात नाही. पगाराची स्लिप ही दिली जात नाही. पगारवाढ आणि पीएफची मागणी करणाऱ्यांना तत्काळ बाहेरचा रस्ता दाखवला जातो. शिंदे फडणवीस सरकार पारदर्शक कारभार करून मतदारांची मने जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत  तर दुसरीकडे भारत इंटेलिजेंस सिक्योरिटी फोर्स सारख्या एजन्सी कर्मचाऱ्यांची पिळवणूक करत आहेत आणि सरकारच्या नियमांची पायमल्ली करत त्यांचे शोषण करित आहेत. नगर परिषद सदर प्रकरण तपास करुण एजन्सी वर कार्रवाई करुण कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा भाजपा कामगार मोर्चा द्वारे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपा कामगार मोर्चा कडून देण्यात आला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos