शेतात काम करीत असलेल्या विधवा महिलेवर बलात्कार आरोपीस अटक


- अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल  
प्रतिनिधी / गडचिरोली :
शेतात काम करीत असलेल्या  विधवा महिलेवर एका युवकाने बळजबरी करुन बलात्कार केल्याची घृणास्पद घटना काल  २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान आरमोरी पोलीस ठाण्यांतर्गत चांभार्डा  गावातील शेतशिवारात घडली. आरमोरी पोलीसांना आरोपीला अटक केली आहे.
सुभाष हनुमंत देशमुख वय  (२५)  रा. चांभार्डा असे आरोपीचे नाव आहे.  पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार काल शनिवारी सकाळच्या सुमारास पिडीत विधवा महिला ही आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती. तिच्याच शेताला लागुन आरोपीचे शेत सुध्दा आहे. शेतात विधवा महिला एकटीच असल्याचे पाहून वासनांध आरोपीने तिच्यावर बळजबरी करुन बलात्कार केला. त्यानंतर आरोपी शेतशिवारातून फरार झाला. फिर्यादी महिलेने या घटनेची माहिती आरमोरी पोलीस स्टेशन मध्ये दिली. तक्रारीच्या अनुषंगाने  पोलीसांनी आरोपी विरूध्द भांदवी ३७६ व अ‍ॅट्रासिटी अ‍ॅक्ट अंतर्गत ( अनु. जाती/ अनु. जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा) गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीला आरमोरी कोर्टात दाखल केले असता. त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे करीत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-24


Related Photos