बेरोजगारी हटवून युवकांना सशक्त बनविण्याचा निर्धार : विश्वजीत तांबे


- चलो पंचायत अभियानातून युवक काँंग्रेसचा नारा 
प्रतिनिधी/  गडचिरोली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २ कोटी बेरोजगारांना नोकरी देणार म्हणून गवगवा केला. परंतू त्यांचे आश्वासन फोल ठरले. भाजपा सरकार बेरोजगारी हटविण्यात अपयशी ठरले आहेत.  त्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष खा.राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून युवक काँग्रेसच्या वतीने चलो पंचायत अभियानाच्या माध्यमातून बेरोजगारी हटवून युवकांना सशक्त बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गावागावात जाऊन युवा शक्ती कार्डच्या माध्यमातून युवकांना जागृत करण्यात येत असल्याची माहिती युवक काँग्रेचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत तांबे यांनी आज २४ फेब्रुवारी रोजी आयोजीत पत्रकार परिषदेतून दिली.
 पत्रकार पत्रकार परिषदेला युवक काँग्रेसच्या प्रदेश सचिव शिवानीताई वडेट्टीवार, विश्वजीत कोवासे, महेंंद्र ब्राम्हणवाडे, अजित सिंग, काँग्रेसचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतिश विधाते, लॉरेन गेडाम, अतुल मल्लेलवार,अधिर इंगोले, प्रतिक बारसिंगे, प्रशांत मोटवानी, डॉ.चंदाताई कोडवते, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, तौफिक शेख, आशिष कन्नमवार, रजनिकांत मोटघरे, मिलींद बागेसर उपस्थि होते. 
 सत्यजित तांबे यांनी चलो पंचायत अभियानाची माहिती दिली. या अभियानांतर्गत युवक काँगेस पाच कलमी कार्यक्रम राबवीत असून, बेरोजगारांना युवा शक्ती कार्ड देण्यात येत आहेत. राज्यात आतापर्यंत साडेचार हजार कार्यक्रम झाले असून, आचारसंहिता लागू होईपर्यंत हे अभियान सुरुच राहील. त्यानंतर चलो वॉर्ड अभियान व पुढे चलो घर घर अभियान राबविण्यात येणार असल्याचे तांबे यांनी सांगितले.
२०१४ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु एनएसएसओच्या सर्वेक्षणानुसार बेरोजगारांना नोकNया मिळाल्या तर नाहीच; उलट १ कोटी १६ लाख नोकऱ्या  कमी झाल्या. जीएसटी, नोटाबंदी यासारख्या निर्णयांमुळे ही परिस्थिती ओढवली. नोकरी नसल्याने शेतकऱ्याप्रमाणेच बेरोजगारही निराश होऊन आत्महत्या करु लागले असून, ही चिंतेची बाब आहे. बेरोजगार युवकांमध्ये असंतोष असल्याने त्यांचे लक्ष विचलित करुन त्यांना खेळात गुंतवून ठेवण्यासाठी सीएम चषक सारखे कार्यक्रम घेण्यात येत असल्याचा आरोप तांबे यांनी केला.
बेरोजगारी दूर करण्यासाठी काँग्रेसकडे ठोस कार्यक्रम असून, मध्यप्रदेश, छत्तीसगड व राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार येताच बेरोजगारांना भत्ता देण्यास सुरुवात झाली आहे. तेथील शेतकऱ्यांना  चोवीस तासांत सरसकट कर्जमाफी दिली आहे. महाराष्ट्रात काँग्रेस या दोन्ही गोष्टी करेल, शिवाय बेरोजगारांना बिनव्याजी १० लाखांपर्यंत कर्ज देऊ, असे सत्यजित तांबे यांनी सांगितले. चलो पंचायत अभियानादरम्यान राफेल घोटाळ्याची माहिती देणे व गावागावात युवक काँग्रेसच्या शाखा उघडण्याचे कामही करण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसाद असल्याचे.तांबे यांनी सांगितले. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-24


Related Photos