आजपासून प्रारंभ होणार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना


- पहिल्या टप्प्यात एक कोटी शेतकऱ्यांना दोन हजार रुपये 
वृत्तसंस्था / नवीदिल्ली
:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज, रविवारी तब्बल ७५,००० कोटी रुपयांच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम-किसान) या योजनेस उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून प्रारंभ होणार आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात एक कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा केला जाणार आहे. 
आणखी एक कोटी शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसांत या योजनेअंतर्गत निधीचा पहिला हप्ता मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.  सन २०१९-२०च्या हंगामी अर्तसंकल्पात पीएम-किसान या योजनेची घोषणा करण्यात आली होती. याअंतर्गत दोन हेक्टर किंवा त्याहून कमी लागवडयोग्य जमीन असलेल्या देशभरातील १२ कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा निधी दिला जाणार आहे. ही रक्कम तीन टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. कृषी क्षेत्रातील आर्थिक संकटावर मात करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाआहे.  या आर्थिक वर्षापासूनच ही योजना लागू होणार असून मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंतच यातील पहिला हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे.   Print


News - World | Posted : 2019-02-24


Related Photos