महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : वासेरा येथे भुरट्या चोरांचा धुमाकूळ


- अन्..पाच रुपयांसाठी वॉटर एटीएम फोडले 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यालय वासेरा अंतर्गत मागील चार महिन्यापूर्वी थंड आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर एटीएम सुरू कण्यात आले. मात्र शनिवारच्या रात्री भुरट्या चोरांनी त्या एटीएम मधील पाच रुपयाचे नाणे चोरून नेण्यासाठी चक्क वॉटर एटीएम फोडल्याने गावात पिण्याच्या पाण्याचा हाहाकार झालेला होता.


गाव तेथे वॉटर एटीएम या शासनाच्या अभियानात जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग मार्फत जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी अंतर्गत मागील एक वर्षापासून वॉटर एटीएम चे काम सुरू होते. मागील चार महिन्यांपूर्वी वासेरा येथील वॉटर एटीएम मशीन सुरू करण्यात आले. तेव्हापासून नागरिकांना थंड आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळू लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मशीनमध्ये पाच रुपयाचे नाणे टाकून नागरिकांना १५ लिटर पाणी  विकत घेता येत होते. अशातच शनिवारी रात्री भुरट्या चोरांनी वॉटर एटीएम मशीन फोडून तेथील नाणे चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वॉटर एटीएम मशीन बंद पडलेली आहे.


विशेष म्हणजे गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या नळयोजनेचा विद्युत पुरवठा शनिवारपासून खंडित झाला असल्याने गावातील नळाना पाणी आलेले नाहीत. आणि वॉटर एटीएम मशीन फोडल्याने मशीन बंद झाली.
त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्यासाठी हाहाकार माजला आहे. वॉटर एटीएम मशीन फोडल्याची माहिती ग्राम पंचायत सरपंच महेश बोरकर वासेरा, पोलीस पाटील देवेंद्र तलांडे यांना माहिती पडताच त्यांची घटनास्थळी जावून पाहणी केली. आणि घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली. त्यामुळे लागलीच बीट अमलदार बावणे हे घटनास्थळी जावून मोका चौकशी केली आणि पुढील तपास सुरु केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos