महत्वाच्या बातम्या

 मुख्याध्यापक मुलाने आईला पोटगी देण्यास नकार दिल्याने न्यायालयीन आदेशाच्या अवमानणेचा प्रस्ताव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / भंडारा : कौटुंबिक न्यायालयात एका विशेष पोटगीच्या प्रकरणात ज्यामध्ये अर्जदार ही गैरअर्जदार याची आई आहे. या प्रकरणामध्ये गैरअर्जदार मुलगा याचे विरुद्ध पगार जप्ती वॉरंट पाठवण्यात आले होते. गैरअर्जदार हा शासकीय अनुदान प्राप्त संस्थेमध्ये मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे व असे असतांनाही त्याने न्यायालयीन आदेशाची अवहेलना केली. त्याला कुठलीही भीती वाटत नाही. सदर स्वतः विरुद्धचे पगार जप्ती वॉरंट गैरअर्जदार याने तामील केले नाही म्हणून त्याच्या विरूध न्यायालयाच्या आदेशाची अवमानणा केल्याबाबत कार्यवाही का करण्यात येऊ नये अशा आशयाची नोटीस पाठवण्यात आली होती. अर्जदार हिने सदर नोटीस स्वहस्ते गैरअर्जदार यांना दिली होती. गैरअर्जदार हा सुनावणीच्या तारखांना गैरहजर होता. तो दिवाणी स्वरूपाच्या न्यायालयाचा अवमान करतो असे समजले. गैरअर्जदार हा सुनावणीच्या तारखांना गैरहजर आहे. त्याने त्याच्या विरुद्ध कोर्टाच्या आदेशाची अवहेलना केल्याबाबत कार्यवाही का करू नये याबाबत कुठलीही कारणे दाखवलेली नाहीत. जी व्यक्ती स्वेच्छेने जाणीवपूर्वक कोर्टाच्या / न्यायालयाच्या निकालाची, सूचनेची, आदेशाची अथवा समन्स अथवा वॉरंटची बजावणी करीत नाही अथवा बजावणी होउ देत नाही. तो दिवाणी स्वरूपाच्या न्यायालयाचा अवमान करतो असे समजले जाते.

या प्रकरणात गैरअर्जदार स्वतः आहरण व संवितरण अधिकारी असल्याने, त्याने स्वतः विरुद्ध आलेल्या पगार जप्तीच्या वॉरंट वर कार्यवाही केली नाही. पगार कोर्ट आदेशानुसार वजावट करून न्यायालयाकडे पाठविला नाही व बेदकारपणे कोर्ट / न्यायालयाचा अवमान केला असे स्पष्ट दिसून आले. सदर अवमान करण्याचा हेतू अर्जदार आईस पोटगी वसुली करता येऊ नये हाच दुष्ट हेतू असल्याचे दिसते. वरील सर्व कारणांवरून गैरअर्जदार याचे विरुद्ध कोर्ट आदेशाची अवमानणा केल्याबाबत योग्य ती शिक्षा करण्याबाबतचा प्रस्ताव मा. उच्च न्यायालय मुंबई, खंडपिठ नागपूर यांना सदर प्रस्ताव पाठवण्याबाबतची कार्यवाही करण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यास आदेशीत करण्यात आले आहे असे कौटुंबिक न्यायालय प्रबंधक एस.एम. रिझवी यांनी कळविले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos