महत्वाच्या बातम्या

 आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्य काऊंटडाउन-९ दिवस


- शेष कार्यक्रमाचे भव्य उद्घाटन संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस  

प्रतिनिधी / भंडारा : आंतरराष्ट्रीय योग दिन २३१ जून रोजी संपूर्ण विश्वात साजरा करण्यात येणार आहे याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी आणि नागरिक, विद्यार्थी यांनी योग करणे सुरू करावे या उद्देशाने भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर आणि योग विद्या धाम नाशिक अंतर्गत कार्यरत योग विद्या धाम भंडारा शाखा व असर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक योगदिवसाच्या निमित्याने प्रोटोकॉल वर्गाचे प्रचारार्थ काउंट डाऊन समारोहाचा भव्य उद्घाटन सोहळा भंडारा येथे स्प्रिंग डेल शाळेच्या पटांगणात उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी स्प्रिंग डेल शाळेच्या संचालिका शुभांगी मेंढे, योग क्षेत्रातील ज्येष्ठ शिक्षक श्याम कुकडे, रमेशजी खोब्रागडे, महर्षी विद्या मंदिर च्या प्राचार्या श्रुती ओहोळे, प्रजापिता ब्रह्मकुमारी अध्यात्म केंद्राच्या शालू दीदी, नगरसेविका जयश्री बोरकर, रोशनी पडोळे आणि योग विद्या धाम भंडाराचे अध्यक्ष विलासजी फटे व कार्यवाह डॉ. नरेंद्र व्यवहारे, देव्हारे सर मंचावर उपस्थित होते.

संस्कार भारतीच्या सुंदर रांगोळ्यांनी सजवलेल्या ओंकार आणि भारत मातेच्या फोटो समोर सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून भारत माता पूजन करण्यात आले. तसेच योग दिनासाठी नियोजित प्रार्थना अर्थासहित म्हटल्या गेली. सर्व पाहुण्यांचा तुळशीचे रोप आणि प्लास्टिक मुक्त कापडी पिशवी देऊन सत्कार करण्यात आला आणि वृक्ष लागवडीचा व प्लास्टिकचा वापर टाळण्याचा संदेश देण्यात आला.

योग विद्या धाम भंडाराच्या साधिकांनी डॉ. विनोद पथ्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली सुश्राव्य योग गीत सादर केले. तसेच सूर्यनमस्कारांचे आसनांच्या साखळी सहित सुंदर प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. असर फाउंडेशनच्या कलाकारांनी योगासाठी जनतेला प्रोत्साहन देण्यासाठी भारुडाची योजना करत अप्रतिम भारुड सादर केले आणि उपस्थित जनतेला योग अंगीकार करण्याचा संदेश दिला.

कार्यक्रमाला उपस्थित शुभांगी मेंढे यांनी सर्व उपस्थित साधकांना प्रोटोकॉल वर्गासाठी शुभेच्छा दिल्या आणि योगासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देत योग विद्या धाम शाखा भंडाराच्या कार्याची प्रशंसा केली. तसेच योगाचे जीवनातील महत्त्व विशद करून सांगितले व स्वतः पुन्हा योगाकडे वळत जीवनात योग अंगीकार करण्याचा संकल्प केला.
केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे संजय तिवारी यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा देत या प्रोटोकॉल वर्ग नौ दिन शेष प्रमोशन कार्यक्रमाचा उद्देश सर्वांना विशद करून सांगितला आणि सर्वांना योगाकडे वळण्यासाठी आग्रह धरीत शुभेच्छा दिल्या.

यानंतर योगशिक्षिका जयश्री फटे तसेच सहशिक्षिका रुची पटेल व अमिता दहीकर यांनी सर्व उपस्थित साधकांकडून पूरक हालचाली, योगासने व प्राणायामाचा अभ्यास करवून घेतला. डॉ. नरेंद्र व्यवहारे यांनी विश्व कल्याण प्रार्थना गायन करत या भव्य कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्यूरो चे संजय तिवारी यांनी केले तर संचालन योगशिक्षिका डॉ. अश्विनी व्यवहारे यांनी केले. कार्यक्रमाच्या समापन प्रसंगी योगशिक्षक देव्हारे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत या कार्यक्रमात सहभागी सर्व संस्थांचा समर्पक उल्लेख केला.

कार्यक्रम स्थळी सुंदर रांगोळ्यांचे रेखाटन चंदाताई मुरकुटे व नीता मलेवार, करुणा शेंडे यांनी केले होते. निःशुल्क योग शिबिर आणि या कार्यक्रमासाठी संजय आगाशे, महेश जोशी, अनिमेश पथ्ये, शिशिर व सोनाली पाठक, नीता मलेवार, चंदा मुरकुटे, करुणा शेंडे, सीमा देव्हारे, अनिकेत देव्हारे, रंजना घोडोले, मेघा भागवत, अर्चना पथ्ये, संगीता व्यवहारे, नंदा तिडके, मृणाल माकडे, रुपाली निर्वाण, नंदा कावळे, सविता गंगणे, शालिनी बालबुधे, रिता आदमने, विनायक बुरंगे, निखाडे आणि असर फाउंडेशन चे कलाकार विक्रम फडके, वैभव कोलते, प्रियंका कोलते व चमू यांचा उस्फूर्त सहभाग होता.





  Print






News - Bhandara




Related Photos