कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला घेतले ताब्यात


वृत्तसंस्था / श्रीनगर :  कलम ३५ अ या कलमाविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देणार असतानाच या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ताब्यात घेतले. कोठीबाठ पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आले आहे.  
१४ मे १९५४ रोजी तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी एक आदेश पारित केला होता. या आदेशान्वये भारताच्या संविधानात एक नवीन कलम ३५ (अ) जोडण्यात आले. कलम ३५ अ, कलम ३७० चाच हिस्सा आहे. कलम ३५ अ नुसार, जम्मू-काश्मीरमधील नागरिक तेव्हाच राज्याचा हिस्सा मानला जाईल जेव्हा त्याचा जन्म त्या राज्यातच होईल. इतर राज्यातील कोणताही नागरिक जम्मू-काश्मीरमध्ये संपत्ती खरेदी करू शकत नाही किंवा तेथील नागरिक बनू शकत नाही. या कलमाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली असून या याचिकेवर सुप्रीम कोर्ट सोमवारी निर्णय देण्याची शक्यता आहे.  सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असून या निकालाच्या पार्श्वभूमीवर जम्मू- काश्मीरमधील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने फुटीरतावादी नेता यासीन मलिकला निवासस्थानातून ताब्यात घेतले.   Print


News - World | Posted : 2019-02-23


Related Photos