३ हजारांची लाच स्वीकारली, तलाठी एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / गोंदिया : माती वाहतूक करणारा ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच व वर्षभर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दहा हजारांची लाच मागून ३ हजारांची लाच स्वीकारताना तलाठ्यास अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र टोलीराम नेवारे   (३५)  तलाठी कार्यालय सेजगांव, साझा क्र. ४ ता. तिरोडा, जि. गोंदिया  असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. लाचरक्कम  तक्रारदार  सेजगांव, ता. तिरोडा  येथील रहीवासी असुन एम.एच. ३५ जी-९१०८  क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेतीचे तसेच माती/मुरूम वाहतुकीची कामे करतो. १९ फेब्रुवारी रोजी ट्रॅक्टरने मातीची वाहतुक करीत असतांना तक्रारदारचा ट्रॅक्टर तलाठी देवेंद्र  यांनी  सेजगावामध्ये पकडला. त्यावेळी तक्रारदारांनी तलाठी देवेन्द्र टोलीराम नेवारे यांना ट्रॅक्टर सोडण्याबाबत विनंती केली असता त्यांनी तक्रारदार यांचे ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदारास  १० हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने तलाठी देवेन्द्र नेवारे यांना नाईलाजाने   दोन हजार रूपये  व उर्वरीत ८ हजार रूपयांची  व्यवस्था करून नंतर आणुन देतो असे सांगितले. २० फेब्रुवारी रोजी  तलाठी नेवारे यांनी तक्रारदाराचे घरी जावुन तक्रारदारास उर्वरीत ८ हजार रूपये लाच रकमेची मागणी केली. तक्रारदार यांची तलाठी नेवारे यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदविली. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान तलाठी देवेंद्र नेवारे  यांनी तक्रारदाराकडून ट्रॅक्टरवर वर्षभर कोणतीही कार्यवाही न करण्याकरीता उर्वरीत ८ हजार रूपये लाचेची मागणी करून पहिला हप्ता म्हणून  ३ हजार रूपये लाच रक्कम स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द आज २२ फेब्रुवारी रोजी पोलीस ठाणे गंगाझरी ता. जि. गोंदिया येथे  लाचलुचपत प्रतिबंध १९८८ (संशोधन अधिनियम २०१८ ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

सदर कार्यवाही पोलिस उपायुक्त, पोलिस अधीक्षक  श्रीकांत धिवरे, (अतिरिक्त कार्यभार) , अपर पोलिस अधीक्षक राजेश  दुद्दलवार, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक  रमाकांत कोकाटे, पोलिस हवालदार राजेश शेंद्रे ना.पो.शि. रंजीत बिसेन, डिगांबर जाधव, राजेंद्र बिसेन, मनापोशि वंदना बिसेन, गीता खोब्रागडे व चालक नापोशि. देवानंद मारबते यांनी केली आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-02-22


Related Photos