जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला दहशतवादविरोधी पथकाने केली अटक


वृत्तसंस्था / सहारनपूर :    उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्याला अटक केली आहे. शाहनवाझ असे या दहशतवाद्याचे नाव असून तो मुळचा कुलगाम येथील रहिवासी आहे.
पुलवामा येथे गेल्या आठवड्यात सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४१ जवान शहीद झाले होते. जैश-ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. यानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणांनी दहशतवादाविरोधातील मोहीम तीव्र केली आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एटीएसला मोठे यश मिळाले असून एटीएसने सहारनपूर येथील शाहनवाझ याला अटक केली आहे. शाहनवाझ हा ‘जैश’साठी तरुणांची भरती करायचा, असे सूत्रांनी सांगितले.    Print


News - World | Posted : 2019-02-22


Related Photos