महत्वाच्या बातम्या

 एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्टेअरिंग महिलेच्या हाती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) इतिहासामध्ये पहिल्यांदाच एका महिलेने सासवड ते नीरा या मार्गावर बस चालवली.
अर्चना अत्राम असे पहिल्या महिला एसटी बस चालकाचे नाव आहे. गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता अत्राम या सासवड डेपोतून निरासाठी बस घेऊन गेल्या. यावेळी बसमध्ये १७ प्रवासी होते. अत्राम यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या गुरूवारी सासवड आगारात रुजू झाल्या. एसटी महामंडळामध्ये याआधी महिला वाहक म्हणून काम करत होत्या, पण पहिल्यांदाच एक महिला चालक म्हणून महिला स्टेअरिंगवर बसल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.


अत्राम यांनी बस चालवल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, नेटकऱ्यांनी अक्षरश: कौतुकाचा वर्षाव त्यांच्यावर केला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील ट्विटद्वारे अत्राम यांचे अभिनंदन केले. नवीन जबाबदारी तुझी, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहचवण्याची. एसटीच्या इतिहासामध्ये राज्यात पहिल्यांदाच अर्चना अत्राम यांनी बस चालवून इतिहास घडवला. राज्य महिला आयोगाच्या वतीने अत्राम यांचे अभिनंदन असे या संदेशामध्ये म्हटले आहे.


१७ महिलांची लवकरच नियुक्ती...
एसटी महामंडळाने दीड ते दोन वर्षांपूर्वी महिला चालकांची भरती केली होती. त्यावेळी ३० ते ४० महिला चालकांची भरती करण्याचे नियोजन होते. त्यापैकी १७ महिला चालकांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, त्या लवकरच पुणे विभागात रुजू होणार आहेत.





  Print






News - Rajy




Related Photos