महत्वाच्या बातम्या

 साखेरा येथे ग्राम बाल संरक्षण समिती गठीत : स्पर्श संस्थेचा पुढाकार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / धानोरा : धानोरा तालुक्यातील साखेरा ग्रामपंचायत येथे ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून बालकांची काळजी व संरक्षण कायदा 2006 नुसार बालकांच्या विविध समस्येवर नियंत्रण ठेवण्याकरिता ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करणे आवश्यक असते, त्याकरिता स्पर्श गडचिरोली ही संस्था एक्सेस टू जस्टीस फार चिल्ड्रेन हा प्रकल्प राबवित असून या प्रकल्पा अंतर्गत बालविवाह, मानव तस्करी, बाललैंगिक अत्याचार,  यावर काम करीत असून साखेरा गावाला बालविवाह मुक्त व बालकांच्या इतर समस्यांचे निराकरण करण्याकरिता साखेरा येथे पुढाकार घेऊन ग्राम बालसंरक्षण समिती गठीत केली. 


याकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेचे अध्यक्ष दळांजे सरपंच ग्रामपंचायत साखरा, तसेच ग्रामसेवक दामले, पोटावी, उसेंडी ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकेश सोमनकर क्षेत्र समन्वयक स्पर्श, वैभव के.सोनटक्के क्षेत्र अधिकारी स्पर्श तसेच गावातील महिला पुरुष व किशोरवयीन मुली मुले उपस्थित होते. 


बाल संरक्षण समिती कार्यकारणी : 
1) अध्यक्ष-अनिल केशव दळाजे
2) सचिव -निर्मला कुमरे
3) सदस्य- सुरेश तुंकलवार
4) सदस्य- रामटेके सर
5) सदस्य- प्रतिभा तुंकलवार
6) सदस्य -नीतिका तुंकलवार
7) सदस्य- माधुरी उसेंडी
8) सदस्य- ज्योती कटकेलवार
9) सदस्य- विक्रम घाईत
10) सदस्य- अवंतिका पूजलवार
11) सदस्य-रत्नाकर तुंकलवार





  Print






News - Gadchiroli




Related Photos