उद्यापासून ४८ केंद्रावरून १४ हजार विद्यार्थी देणार १२ वीची परीक्षा


- ६ भरारी पथकाची राहणार नजर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

 प्रतिनिधी/ गडचिरोली :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्या २१ फेब्रुवारी पासून इयत्त्त १२ वीची परीक्षा सुरू होणार आहे. सदर परीक्षा जिल्हाभरातून १३ हजार ९६०  विद्यार्थी देणार आहेत. परीक्षेसाठी ४८ केंद्र ठेवण्यात आले असून सहा भरारी पथक नेमण्यात आले आहेत.  
बारावीची परीक्षा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने परीक्षेचे नियोजन पुर्ण केले आहे.परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी  जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, शिक्षणाधिकारी यांच्या पथकासह तालुकास्तरावर तहसीलदार, पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांचे भरारी पथक लक्ष ठेवणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नुकतीच जिल्हास्तरीय  दक्षता समितीची बैठक पार पडली. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली यावषी  डॉ.एपी.जे.अब्दूल कलाम कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे.  महसूल व शिक्षण विभागाच्या समन्वयातून बारावीची परीक्षा  पार पाडण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिक्षण विभागाला  सहकार्य करावे, असे असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 

तालुकानिहाय विद्यार्थी

गडचिरोली तालुका - २४५२  ,
आरमारी - १५८९  ,
 देसाईगंज - १२९८
 कुरखेडा - ३५९
 कोरची - ५७९
भामरागड - ३१५
 धानोरा - ५८२
 चामोर्शी - २३६७
 मुलचेरा - ७६९
 एटापल्ली  - ५०२
 अहेरी - ११०६
सिरोचा - ८७२  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-20


Related Photos