बीएसएनएलला वाचविण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
भारत संचार निगम लिमिटेड या सरकारी टेलिकाॅम कंपनीकडे सरकारचे दूर्लक्ष होत असूनल बीएसएनएलची सेवा देण्यात अधिकारी व कर्मचारी असक्षम ठरत आहेत, असा आरोप करीत देशभरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तीन दिवसांचा संप पुकारला आहे. 
टेलिकाॅम क्षेत्रातील प्रचंड स्पर्धेत काही खाजगी कंपन्यासुध्दा बंद झाल्या आहेत. मात्र बीएसएनएल आपले अस्तित्व टिकवून दूरसंचार सेवा अहोरात्र देत आहे. मात्र बर्याच गोष्टीत बीएसएनएल ला सरकारवर अवलंबून रहावे लागत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी बीएसएनएल ला ४ जी स्पेक्ट्रम चे वाटप त्वरीत करा, कंपनी नुकसानीत येत असल्याने कंपनीला केंद्र सरकारकडून आर्थिक मदत देण्यात यावी किंवा बॅंकांकडून कर्ज देण्याची परवानगी देण्यात यावी, अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेतन करार त्वरीत लागू करावा या प्रमुख मागण्यांसाठी काल १८ फेब्रुवारीपासून संप पुकारण्यात आला आहे.
सध्यास्थितीती खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचा ग्राहकांना फक्त शहरी भागात सेवा देण्याचा जास्त भर आहे. मात्र बीएसएनएल एकमात्र फायदा व तोट्याचा कुठलाही विचार न करता शहरासोबत ग्रामीण भागात सेवा देत आहे. केलळ राज्यातील महाप्रलय, आंध्रप्रदेशातील चक्रीवादळ, उत्तराखंड मधील ढगफुटी, जम्मू - कश्मिर मधील राष्ट्रीय सुरक्षा आदी राष्ट्रीय आपत्तीप्रसंगी बीएसएनएल ही एकमात्र कंपनी सेवा देत होती. कंपनीचे अस्तित्व टिकून रहावे, यासाठी सरकारने थोडे लक्ष देण्याची गरज आहे. मात्र सरकार दूर्लक्ष करीत असल्याचा आरोप अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केला आहे. सरकारने हस्तक्षेप करून बीएसएनएलला वाचवावे, असेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-19


Related Photos