महत्वाच्या बातम्या

 वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये असुरक्षिततेची भावना, त्वरीत कार्यवाही करुन पिडीत विद्यार्थीनीला न्याय द्यावा : अभाविपची मागणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : 06 जुन, 2023 रोजी सावित्रीबाई फुले विद्यार्थीनी वसतिगृह चर्चगेट मुंबई येथील विद्यार्थीनीसोबत वसतिगृहाच्या सुरक्षारक्षकाने बलात्कार करुन तिची हत्या केली. अशा घटनेमुळे राज्यातील वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने या अतिशय निंदणीय घटनेसंदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर महानगर ने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे नायब तहसिलदार (सामान्य) सौ. गिता उत्तरवार यांना निवेदनाच्या माध्यमातून दोषींवर लवकरात लवकर कठोर कार्यवाही करण्याची व अन्य मागण्या केल्या त्या पुढीलप्रमाणे आहेत.


1)   सुरक्षा रक्षक पुरवठा करणाऱ्या संबंधित संस्थेचा करार सर्व वसतिगृहातून त्वरीत रद्द करावे.
2) मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची नेमणुक करावी तसेच वसतिगृहातील इतर कामगार देखील महिला असाव्यात.
3) वसतिगृह परिसरात सि.सि.टी.व्ही कॅमेरे लावावे व ज्या वसतिगृहात सि.सि.टी.व्ही कॅमेरे चालु स्वरुपात नाहीत ते लवकर दुरूस्त करावे.
4)   या निंदणीय घटनेनंतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीच्या समुपदेशनाची योग्य व्यवस्था करावी.


या मागण्यासंदर्भात अभाविप चंद्रपूर महानगर ने निवेदन दिले. यावेळी अभाविप च्या शिष्टमंडळात विदर्भ प्रदेश मंत्री शक्ती केराम, जिल्हा संयोजक शैलेश दिंडेवार, महानगर प्रसिध्दी प्रमुख अमोल मदने, कुश दवे, अमित पटले, रितीक कनोजिया, कैवल्य तन्निरवार, भुषण डफ, पियुश बनकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos