सी ६० जवानांकरिता अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज 'शक्तीगड' या व्यायामशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली :
नक्षल्यांविरोधात मोठी भूमिका पार पाडणाऱ्या गडचिरोली जिल्हा पोलीस दलातील सी ६० जवानांकरीता अत्याधुनिक व्यायामाच्या उपकरणांनी सुसज्ज शक्तीगड या व्यायामशाळेचे उदघाटन आज १८ फेब्रुवारी रोजी सी ६० कार्यालय गडचिरोली येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांचे  हस्ते पार पडले. 
या व्यायामशाळेचा उदघाटन समारंभ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी गडचिरोली चे पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित (प्रशासन) गडचिरोली, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. मोहीत गर्ग, (नक्षल) गडचिरोली तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी ६० जवानांना या अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज व्यायामशाळेमुळे त्यांची शारिरिक सक्षमता वाढविण्यास नक्कीच फायदा होईल व जवानांचे मनोबल उंचावेल असा आत्मविश्वास उदघाटनाप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केला.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-18


Related Photos