५०० रुपयांची लाच स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात


- लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पथकाची कारवाई 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
३२ वर्षीय तक्रारदाराकडून अदखलपात्र गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई न करण्याच्या कामासाठी १ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५०० रुपये लाच रक्कम स्वीकारतांना देसाईगंज पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या गडचिरोली पथकाने रंगेहात पकडले आहे . नरेंद्र यादवराव खेवले (४९) रा. मुरखळा, असे लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.    
सदर कारवाई ला.प्र.वि.नागपूर परिक्षेत्र,नागपूर पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधिक्षक राजेश दुद्लवार, पोलीस उपअधिक्षक, नागपूर विजय माहुलकर, पोलीस उपअधिक्षक, चंद्रपूर ज्ञानदेव घुगे यांच्या मार्गदर्शनात पोनि रवि राजुलवार, सपोउनि मोरेश्वर लाकडे, पो हवा प्रमोद ढोरे, नापोशी सुधाकर दंडिकेवार, देवेंद्र लोणबळे, पोशी स्वप्नील वडेट्टीवार , चापोशी तुळशीराम नवघरे  यांच्या पथकाने केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-18


Related Photos