महत्वाच्या बातम्या

 रक्तदान हेच श्रेष्ठदान : आ. डॉ. देवराव होळी


- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाड्याचा रक्तदान शिबिराच्या आयोजनाने समारोप

- संत निरंकारी मंडळ चामोर्शीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांचे हस्ते उद्घाटन

- भाजपा जिल्हाध्यक्ष तथा निरंकारी मिशनचे प्रमुख किसन नागदेवे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन

तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : आपण केलेल्या रक्तदानाने दुसऱ्याला जीवन मिळत असून यापेक्षा कोणतेही दान हे श्रेष्ठ नसल्याचे प्रतिपादन आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी चामोर्शी येथील निरंकारी सेवा मंडळाच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी केले.

यावेळी निरंकारी मिशनचे प्रमुख किसन नागदेवे, चामोर्शी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा जयश्री वायलालवार, नगर पंचायत उपाध्यक्ष लोमेश  बुरांडे, बांधकाम सभापती वैभव भिवापुरे, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शहा, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, भाजप तालुका अध्यक्ष दिलीपचलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, यांचे सह निरंकारी मिशनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा संपूर्ण देशभरामध्ये साजरा करण्यात येत असून आज त्याचा समारोपीय दिवस आहे. त्यानिमित्ताने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos