कर्जबाजारीपणाला कंटाळुन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या : अरततोंडी येथील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / देसाईगंज :
  तालुक्यातील अरततोंडी (पुनर्रवसीत) येथे कर्जापायी एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव दुधचरण राऊत (२७) असे आहे. सदर घटना काल १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८. ३० च्या दरम्यान घडली. 
 दुधचरणचे लग्न गतवर्षीच झाले. लग्नाला जेमतेम आठ महिन्यांचा कालावधी झाला. संयुक्त कुटुंब असलेल्या कुटुंबातील दुधचरण धाकटा आहे. आई- वडीलांचे चार वर्षापूर्वीच मृत्यू झाला. मोठाभाऊ देखील विवाहित आहे. दोघेही एकत्र राहात होते. वडीलोपार्जीत तिन एकर शेती आहे. सततची नापिकी, घरात अठराविश्व दारीद्र्य, लग्न व शेतीकरीता बँकेचे व इतर आपसी कर्ज उरावर होते. कर्जे वापसीची चिंता दुधचरणला  सतावत होती. या चिंतेने  दिवसेंदिवस तो वैफल्यग्रस्त असायचा. तथापि आपले दुःख तो घरात कधिही बोलून दाखवित नव्हता. शेवटी सदर दुःख असाय्य झाल्याने काल रात्री घरात बायको  दुसऱ्या खोलीत जेवन करीत असतांनाच स्वयंपाक खोलीत त्याने  गळफास घेवून आत्महत्या केली.
 घटनेची माहिती पोलीस स्टेशन देसाईगंज ला देण्यात आली. पोलीसांनी घटनास्थळ गाठून  पंचनामा करून प्रेत उत्तरीय तपासणीकरीता ग्रामीण रुग्णालय देसाईगंज येथे पाठविले. पुढील चौकशी ठाणेदार सिद्धानंद मांडवकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार मोहन सयाम करीत असल्याचे कळते.
 त्याच्यामागे पत्नी, भाऊ, वहिनी आणि पुतने असा परीवार आहे. दुधचरणच्या जाण्याने अरततोंडी व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.
 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-02-18






Related Photos