भारतीय हॅकर्सचा पाकिस्तानवर सायबर हल्ला, २०० वेबसाईट्स केल्या हॅक


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर  भारतीय हॅकर्सने  पाकिस्तानमधील २०० वेबसाईट्स हॅक केल्या आहेत. भारतामधील ‘टीम आय क्रू’ या गटाने हा सायबर हल्ला केल्याचे बोलले जात आहे.  
पाकिस्तानवर झालेला हा सर्वात मोठा सायबर हल्ला असल्याचा दावा केला जात आहे. हॅक केलेल्या वेबसाईट्सची यादीच सोशल नेटवर्किंगवरुन शेअर करण्यात आली आहे. यामध्ये पाकिस्तानमधील काही सरकारी वेबसाईट्सचाही समावेश आहे. हॅक केलेल्या वेबसाईटवर भारतीय हॅकर्सने, ‘आम्ही १४ फेब्रुवारी  कधीही विसरणार नाही’, ‘पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना समर्पित’ अशा प्रकारचे संदेश पोस्ट केले आहेत. तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणारे मेसेजेसही या वेबसाइटवर हॅकर्सने पोस्ट केले आहेत.   Print


News - World | Posted : 2019-02-18


Related Photos