‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर कामरानचा खात्मा


वृत्तसंस्था / श्रीनगर :  जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सोमवारी पहाटेपासून सुरु असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश- ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यात ‘जैश’चा काश्मीरमधील कमांडर कामरानचा समावेश असल्याची माहिती आहे.  
पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान एका घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. यानंतर सुरु झालेली चकमक सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत सुरु होती. सुरक्षा दलांनी दहशतवादी ज्या घरात लपून बसले होते ते घर स्फोटकांनी उडवल्याचे समजते.  
मृत दहशतवादी  कामरान हा पाकिस्तानचा नागरिक असून तो जैशचा कमांडर होता. या हल्ल्यात मृत्यू झालेला दुसरा दहशतवादी हा पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्याचा मास्टरामाइंड अब्दुल गाझी असल्याचे समजते. गाझी हा मसूद अझहरचा निकटवर्तीय आहे. मात्र, या वृत्ताबाबत अद्याप सुरक्षा दलांनी दुजोरा दिलेला नाही.  Print


News - World | Posted : 2019-02-18


Related Photos