पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक ची भीती, सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलविले


वृत्तसंस्था / श्रीनगर :  पुलवामा हल्यानंतर पाकिस्तान आणि दहशतावाद्याविरोधात भारत कडक कारवाई करणार असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची  भीती असून  सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवण्यात आल्याचे वृत्त आहे.  
उरी येथील हल्ल्यानंतर भारताने  सर्जिकल स्ट्राईक केला होता. आता पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्कराला पूर्णपणे स्वतंत्र्य दिले आहे. ये नया भारत है, हिशेब चुकता करणारच, पुलवामा हल्ल्याच्या गुन्हेगारांना शिक्षा मिळणारच, हा नवीन धोरण राबवणारा भारत आहे हे पाकिस्तानने विसरु नये, असे पाकिस्तानला ठणकावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोकळीक दिल्यानंर लष्करानेही या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. भारताची तयारी पाहून पाकिस्तानमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे धास्तावलेल्या पाकिस्तानने सीमेलगतच्या अतिरेकी अड्ड्यांना लष्कर कँपजवळ हलवलं आहे. दरम्यान, नियंत्रण रेषेपलिकडे असलेल्या दहशतवाद्यांच्या लॉन्च पॅडवर कारवाई करण्याचा भारताची इरादा नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.   Print


News - World | Posted : 2019-02-17


Related Photos