निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा पोलिस महानिरीक्षकांच्या हस्ते गौरव


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा पोलिस विभाग आणि आदिवासी विकास विभागाच्या वतीने आपला महाराष्ट्र दर्शन सहल सुवर्णजयंती सहल योजनेंतर्गत २२ वी सहल १५ ते २९ जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या सहलीत सहभागी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील विविध स्थळांना भेट दिल्या. यानंतर त्यांच्यामध्ये एक नवा उत्साह निर्माण झाला होता. या सहलीच्या माध्यमातूनच महाराष्ट्र दर्शन सहल या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत सहभागी होत विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. या स्पर्धेतील उत्कृष्ट ३ विजेत्यांना पोलिस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्याहस्ते रोख बक्षिस वितरीत करण्यात आले.
सहलीत सहभागी ८० विद्यार्थ्यांमधून शासकीय आश्रमशाळा जारावंडी ची विद्यार्थीनी ज्योती राजु नैताम रा . कांदळी ता. एटापल्ली हिला प्रथम क्रमांकाचे १ हजार ५००  रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा येथील विद्यार्थी अजय भिमा येरमा रा. किष्टय्यापल्ली ता. सिरोंचा याला द्वितीय क्रमांकाचे १ हजार रूपयांचे पारितोषिक आणि जय पेरसापेन आश्रमशाळा भागरामड येथील विद्यार्थी अभिमन्यू देवाजी सिडाम रा. आरेवाडा ता. भामरागड याला तृतीय क्रमांकाचे ८०० रूपयांचे पारितोषिक देण्यात आले. स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन केले. बक्षिस वितरण कार्यक्रमाला अपर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलिस अधीक्षक डाॅ. मोहित गर्ग उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-17


Related Photos