शेतात किटकनाशकाची फवारणी करतांना महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : 
शेतातील फळभाजी पिकावर किटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सायगाव येथे आज १६ फेब्रुवारी रोजी घडली. 
अर्चना हरिदास माकडे (४५) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्यांनी आपल्या शेतात फळभाजीची लागवड केली आहे. पिकावर फवारणी करीत असतांना विषबाधा झाली. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.त्यांच्या पश्चात पती, २ मुले १ मुलगी आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-16


Related Photos