महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : तहसील कार्यालयावर आंबेडकरी समाजाचा भव्य मोर्चा


- दलित तरुणाचा निर्घृण हत्येचा निषेध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव नामक सामाजिक तरुण कार्यकर्त्याची तेथील जातीयवादी, मनुवादी व विकृत मानसिकतावादी नराधमांनी निर्घृण हत्या केलेच्या निषेधार्थ त्यांना सजा मिळावी, त्यांच्या कुटुंबियांना सामाजिक व आर्थिक संरक्षण मिळावे आणि बौद्ध बहुज समाजावर भ्याड हल्ले होणार नाहीत. यासाठी महाराष्ट्र सरकारने जातीने लक्ष घालावे, आदी मागण्यांसाठी सिंदेवाही तालुक्यातील विविध आंबेडकरी पक्ष, सामाजिक संघटना व बौद्ध बांधवांच्यावतीने शिवाजी चौक ते तहसील कार्यालय मोर्चाचे विविध घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रींना समाजाच्या शिष्टमंडळातर्फे निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली .

यावेळी भिम आर्मी संघटना, भारतीय बौद्ध महासभा, बामसेफ, बहुजन समाज पार्टी, वंचित बहुजन आघाडी, बौद्धजन समाज समिती, बहुजन विद्यार्थी फेडरेशन, बुद्धिस्ट कर्मचारी व संघ आदी पक्ष, संघटनेचे प्रतिनिधी म्हणून सुनील गेडाम, डॉ. राजपाल खोब्रागडे, विजय गेडाम, शिल्पाल तांबागडे, प्रा. भारत मेश्राम, शैलेंद्र खंडाळे, डॉ. रेवानंद बांबोळे, अनिल बारसागडे, आत्माराम मेश्राम, प्रा. जगदीश सेमस्कार, मुकेश बनसोड, सूर्यजीत खोब्रागडे, सुशीम नागदेवते, ब्राह्मणे, तेजेंद्र नागदेवते, कपिल मेश्राम, अमोल निनावे, हर्षल लिंगायत आदी सहभागी झाले होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos