महत्वाच्या बातम्या

 डबल इंजिन सरकारमुळे शेतकऱ्यांना मिळणार किसान सन्मान योजनेचा दुप्पट लाभ


- शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी : आमदार विनोद अग्रवाल
- ग्राम रायपुर येथे ११ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : केंद्र सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेत शेतकऱ्यांवर आर्थिक ताण कमी करण्याच्या उद्देशाने किसान सन्मान योजना सुरु केली या मुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. आता पर्यंत १० पेक्षा अधिक वेळा केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले. याला अनुरूप राज्यात भाजप शिवसेनेच्या सरकारने सुद्धा राज्याची मोदी किसान सन्मान योजना सुरु केली असून आता शेतकऱ्यांना मिळणारी किसान सन्मान निधी आता दुप्पट झाली असून डबल इंजिन सरकार मुळे शेतकऱ्यांना डबल लाभ होणार असल्याचे प्रतिपादन जनतेचे आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. या करिता शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर ई-केवायसी करावी असे आवाहन देखील आमदार विनोद अग्रवाल यांनी केले आहे. ग्राम रायपुर येथे ११ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.


भूमिपूजन केलेल्या कामांमध्ये निलागोंदी रायपुर-दासगाव-निलज रस्ता ३ करोड़ ४१ लाख,  रायपुर-लोहारा-कन्हारटोला-लहीटोला रस्ता ३ करोड़,  रायपुर-गिरोला रस्ता १ करोड़ ९० लाख, रायपुर-बिर्सी रस्ता १ करोड़ २८ लाख, रायपुर-नवेगाव (धा) रस्ता १ करोड़ २५ लाख असे कार्य करण्यात येणार असून सोबतच गावांतर्गत सिमेंट रस्ता एवं महात्मा फुले समाजभवन बांधकाम, महात्मा फुले परिसर सौंदर्यीकरण, हनुमान मंदिर परिसर सौंदर्यीकरण व गोवारी समाज परिसर सौंदर्यीकरण कार्याचे भूमिपूजन संपन्न झाले. सोबतच जिल्हा परिषद शाळा वर्गखोली, सीमेंट रास्ता व  विंधन विहिर चे लोकार्पण करण्यात आले.


यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुनेश रहांगडाले सभापती पंचायत समिती गोंदिया, उपाध्यक्ष म्हणून छाया नेवारे सरपंच ग्रामपंचायत रायपुर, भाऊराव उके सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया, छत्रपाल तुरकर ग्रामीण मंडळ अध्यक्ष जनता कि पार्टी, चैताली नागपुरे, तालुका महिला अध्यक्ष चाबी संघटना, जि.प. सदस्य आनंदा वाडीवा, वैशाली ताई पंधरे, दीपा चंद्रिकापुरे, ममता वाळवे, शांता देशभ्रतार, पंचायत समिती सदस्य भुवनलाल नागपुरे, शशीकला कटरे, चुन्नीलाल रहांगडाले अध्यक्ष चाबी संघटना रायपुर, ओमकार मातरे उप सरपंच ग्रामपंचायत रायपुर, ग्रामपंचायत सदस्य लता हटेले, सरस्वती टेकाम, विनोद बागडे, कल्पना कोहरे, शैलेश गजभिये, अलका ठाकरे, उमेश ठाकरे, उषा फाये, राहुल रोकडे अध्यक्ष तंटा मुक्ती समिती रायपुर, पोलीस पाटील लोकचंद बिजेवार व जनता कि पार्टी चाबी संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते. 





  Print






News - Gondia




Related Photos