महत्वाच्या बातम्या

 ड्रीमलँड सिटीला घुग्घुस शहरातील सर्वात सुंदर कॉलनी बनवणार : देवराव भोंगळे


- ड्रीमलँड सिटीतील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : तालुक्यातील घुग्घुस शहरातील ड्रीमलँड सिटी कॉलनीतील मुख्य मार्गाचे सौंदर्यीकरण व्हावे, रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा, अशी कॉलनी वासियांची अनेक दिवसांपासून मागणी होती.
मुख्य मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी ड्रीमलँड सिटीतील रहिवासी नागरिकांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व युवानेते बबलू सातपुते यांच्यासोबत भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट घेतली व समस्या समजावून सांगितली.



देवराव भोंगळे यांनी सुद्धा त्वरित पावले उचलत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना समस्येपासून अवगत करून दिले. तांत्रिक मान्यता घ्या, निधीची कमतरता पडल्यास पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्याची हमी घेतली. तसेच शासन स्थरावर सतत पाठपुरावा केला. आता ड्रीमलँड सिटीच्या मुख्य मार्गाला सिमेंट काँक्रिटीकरण करण्याच्या कामास भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळाली आहे. रस्त्याच्या बांधकामाची सुरुवात सुद्धा करण्यात आली आहे. हा रस्ता हायजेस्ट मशीन वापरून बांधण्यात येणार आहे त्यामुळे अवघ्या सात दिवसात काम पूर्ण होईल.
या रस्त्याचा फायदा सुखकर्ता गणेश मंदिराच्या भाविकांना दर्शनासाठी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणार आहे.


हा महत्त्वाचा रस्ता बांधून देण्याचे कार्य केल्याबद्दल ड्रीम लँडसिटी येथील नागरिक सुधाकर आसुटकर, सचिन राजूरकर, संकेत बोढे, नागोबा चामाटे, सुनील बावणे, सुनील ताजने, संदीप ताजने, रुपेश पिदुरकर, गजानन भोंगळे, संतोष गुप्ता, प्रवीण चूने, शरद मासिरकर, गजानन ठावरी, कोहळे भाऊ, सुरेश सातपुते, कोडापे भाऊ, मिलमिले भाऊ, अनमोल पाटील, दिनेश पिदुरकर, गायकवाड भाऊ, दिवाकर क्षीरसागर, विनोद भोस्कर, सुनील बावणे, नितीन थेरे, विलास वासेकर, नामदेव,गोपालजी शर्मा, दिनेश काकडे, मनोज डोंगर, दिलीप तुमराम, तुषार करमरकर, विनोद सिंग, साईनाथ पिंपळशेंडे, अबरार भैय्या, विरेंद्र गुप्ता, सुशील कुमार चौधरी, चमन सावरकर, गुलाबराव पाटील, किशोर जुमडे,विलास धोटे, काकडे, पाटील, गंगाराम बोरुळे, किशोर बेहरे, राहुल यादव, काशीनाथ सिरसागर, शेख जमीर शेख कलीम, भीमराव आमटे, राहुल पोरगमवार, प्रशात दास, भास्कर पिदुरकर, भगत नागपुरे, काळे, यांनी देवराव भोंगळे यांचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos