महत्वाच्या बातम्या

 बल्लारपुर : कोयला मजदूर खदान संघ इटक तर्फे खासदार स्व.बाळु धानोरकर यांना श्रध्दांजली 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे ३० मे २०२३ ला दिल्ली येथील वेदांत हाँस्पीटल मध्ये निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर ३१ मे २०२३ ला वरोरा येथे अंतीम संस्कार करण्यात आला. 


त्या निमित्याने खासदार स्व.बाळूभाऊ धानोरकर यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी त्याकरिता बल्लारपुर इंटक कार्यालय, राष्ट्रीय कोयला मजदूर खदान संघ (इंटक) तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली व दोन मिनिटाचा मौन बाळगुण आत्माश शांती प्रदान करण्यात आली.


यावेळी बल्लारपूर क्षेत्रिय अध्यक्ष शंकर दास क्षेत्रिय सचिव विश्वास साळवे, सुधीर अमराज, बंडू लांडे, आर,एन,सिंग, मोतीलाल वर्मा, सुभाष चौधरी, एम.संपत कुमार, सी.आर सिंग, चेतन गेडाम, चुनबात खेंगर, सीताराम निर्मल, मुमताज खान, दुर्गराज आरेकर, सुरेश डाहुले जगतपाल निषाद, रामकिशोर कार्तिक दरेकर, प्रकाश भोंगळे, सोनू बोरकुटे, सचिन धानोरकर, आनंद कनकम, जयदेव रंगारी, श्रीनिवास, रेड्डी, आसिफ शेख, वैध सहपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos