महत्वाच्या बातम्या

 हेल्मेटचा वापर न केल्यास संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्यांविरुध्द प्रशासकीय कारवाई


-  हेल्मेट सक्ती बाबत जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभाग प्रमुखांना सूचना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस

प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहर व जिल्ह्यांतर्गत येणारे सर्व शासकीय, निमशासकीय, महामंडळे, महानगर पालिका, नगरपालिका व सर्व शासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले अधिकारी / कर्मचारी दुचाकीचा वापर करीत असेल तर त्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या परिपत्रकानुसार दुचाकीवर हेल्मेट परिधान करणे सक्तीचे करण्यात आले आहे.

या अनुषंगाने जिल्हा परिषद, चंद्रपूर मुख्यालयात व क्षेत्रीय कार्यालयात काम करणारे अधिकारी / कर्मचारी दुचाकीने येत असल्यास हेल्मेटचा वापर करण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यांनी १ जून २०२३ पासून परिपत्रक निर्गमित केले आहे. हेल्मेटचा वापर न केल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी यांच्या विरुध्द योग्य ती प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, याबाबत सर्व कार्यालय प्रमुखांना सुचना देण्यात आल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्याम वाखर्डे यांनी कळविले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos