महत्वाच्या बातम्या

 भाविकांसाठी पंढरपूर यात्रेकरीता विशेष बस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : क्षेत्र पंढरपुर येथे आषाढी एकादशी यात्रेनिमित्य जाणाऱ्या भाविकांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने २३ जुन पासून जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य परिवहन विभागाच्या विभाग नियंत्रकांनी केले आहे.

वर्धा आगारातून २४, आर्वी आगारातून १२, हिंगणघाट १५, तळेगाव ३ व पुलगाव आगारातून ५ अशा ५९ जादा बसेस सोडण्यात येणार आहे. वर्धा ते पंढरपूर करीता पूर्ण तिकीट ९०५ रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ४५५ रुपये आहे. आर्वी ते पंढरपूर पुर्ण तिकीट ८९५ रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ४५० रुपये, हिंगणघाट ते पंढरपूर पुर्ण तिकीट १ हजार ६० रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ५३० रुपये, तळेगाव ते पंढरपूर पुर्ण तिकीट ९५० रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ४८० रुपये व पुलगाव ते पंढरपूर पुर्ण तिकीट ८९० रुपये तर जेष्ठ नागरिक व महिलांसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहे.

गावकरी समुह, वारकरी समुह, भजनी मंडळ व मंदीर समिती यासारख्या समुहास एकत्रित थेट प्रवासाची सोय मिळावी याकरीता ॲडव्हॉन्स बुकींग सोय सर्वच बसस्थानकावर करण्यात आली आहे. तसेच जेष्ठ नागरिक, अमृत जेष्ठ नागरिक योजना व महिला सन्मान योजनेंतर्गत देय असलेल्या तिकिट दराच्या सवलतीसह ॲडव्हाँस बुकींग सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. भाविकांनी या जादा बसेसचा लाभ घेण्यासाठी संबंधित आगार प्रमुखाशी संपर्क साधावा, असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos