महत्वाच्या बातम्या

 आजचे दिनविशेष


७ जून महत्वाच्या घटना

१८९३ : महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

१९३८ : डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण.

१९६५ : अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

१९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्येे सुरुवात झाली.

१९७९ : रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण.

१९८१ : इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.

१९८५ : विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.

१९९१ : फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.

१९९४ : आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.

२००१ : युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत.

२००४ : शिरोमणी अकाली दल (लॉँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

२००६ : अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.

७ जून जन्म

१८३७ : अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

१९१३ : लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

१९१४ : दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

१९१७ : अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

१९४२ : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

१९७४ : भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.

१९८१ : मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.

७ जून मृत्यू

१८२१ : रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

१९५४ : ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२)

१९७० : ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७८ : नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज व्रेफोर्ड यांचे निधन.

१९९२ : मराठी वाङ‌्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

१९९२ : नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९)

२००० : बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७)

२००२ : भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)





  Print






News - todayspecialdays




Related Photos