गडचिरोलीत मुसळधार पावसाची हजेरी, नागरीकांची धावपळ


- रब्बी पिकांचे होणार नुकसान
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने गारपीटीसह हजेरी लावली. यामुळे नागरीकांची चांगलीच धावपळ उडाली आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचे, भाजीपाला पिकांचे तसेच घरांचे नुकसान झाले आहे.
आज १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास देसाईगंज, आरमोरी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. यानंतर रात्री ८ वाजताच्या सुमारास गडचिरोलीसह इतरही भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरीकांची धांदल उडाली आहे. देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. मोठाल्या आकाराच्या गारा कोसळल्यामुळे धानाच्या पऱ्ह्यांचे नुकसान झाले आहे. नागरीकांच्या कौलारू घरांचे नुकसान झाले आहे. सध्या जिल्हाभरात पावसामुळे कोणतीही जीवितहाणी झाल्याची माहिती नाही. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos