पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी कसनासूर गाव घेतले दत्तक


- पोलिस दलाच्या पुढाकाराने गाव दत्तक योजनेतून दुर्गम गावांचा होणार विकास
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
नक्षली कारवाईमुळे चर्चेत आलेले कसनासूर हे गाव दत्तक गाव योजनेतून जिल्हा पोलिस अधीक्षक शेलेश बलकवडे यांनी दत्तक घेतले आहे. यामुळे या गावात पाणी, वीज, आरोग्य, रस्ते, पुल, शिक्षण, बस सुविधा, रोजगार, कृषी व सिंचन, विविध दाखले वितरीत करून विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पुढाकार घेतला जाणार आहे.
गडचिरोली जिल्हा आदिवासी बहुल, नक्षलग्रस्त असून बहुतांश भाग अतिदुर्गम, नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आहे. आहे. नागरीकांच्या अनभिज्ञतेमुळे शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ अजूनही दूर्गम भागातील नागरीकांना मिळालेला नाही. त्यामुळे नागरीकांना मुलभूत समस्यांपासून वंचित रहावे लागते. याचा विचार करून गडचिरोली पोलिस दलाने अतिदुर्गम भागात शासनाच्या योजना व उपक्रम पोहचविण्यासाठी पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून गाव दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे.
या योजनेसाठी जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आली आहे. या पाच गावांपैकी कसनासूर हे गाव पोलिस अधीक्षकांनी दत्तक घेतले आहे. या गावांमध्ये ग्रामभेटीच्या माध्यमातून आढळून आलेल्या समस्या सोडविण्यात येणार आहेत. सोबतच गावातील नागरीकांना गावपातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गरजू नागरीकांना मधमाशापालन, कुक्कूटपालन सासारखे कुटीरोद्योग व लघुउद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गाव दत्तक योजनेत समाविष्ट गावे भविष्यात गडचिरोली जिल्ह्यात आदर्शग गाव म्हणून ओळखला जावा यासाठी पोलिस विभागामार्फत पाठपुरावा करण्यात येणार आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos