महत्वाच्या बातम्या

 सिंदेवाही : बोलेरो गाडीसह लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त


- सिंदेवाही शहरातील पोलिस विभागाची धडक कारवाई

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : सिंदेवाही येथे सुगंधित तंबाखूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती सिंदेवाही पोलिसांना मिळाली. त्यानुसार सिंदेवाही पोलिस विभगाणी सापळा रचून सोमवारला राष्ट्रीय महामार्गावर बेलोरो न्युओ गाडीची चौकशी केली असता त्यामध्ये अवैध सुगंधित तंबाखू आढळून आला. त्यानंतर सिंदेवाही पोलिसांनी कारवाई करीत बोलेरो गाडी क्रमांक एमएच ३५ एआर ८९६२ जप्त करून पोलिस स्टेशनला जमा केले आहे. 

सिंदेवाही येथील पोलिस विभागाने धडक कारवाई करीत बोलेरो गाडीसह लाखो रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला. यात वाहनचालकास अटक केली आहे. सदर कारवाई सिंदेवाही पोलिस निरीक्षक तुषार चव्हाण आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos