लोकबिरादरीच्या मीना उसेंडीचा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
तालुक्यातील लोकबिरादरी आश्रम शाळा, हेमलकसा येथील इ.१० वीची विद्यार्थिंनी खेळाडू मीना महारु उसेंडी हिने भालाफेक या वैयक्तिक खेळ प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. गुजरात राज्यातील नडियाल येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेऊन देशातून ९ वी येण्याचा मान मीनाने मिळविला.
 २०१८-१९ वर्षातील राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा, गुजरात राज्यातील नडियाल येथे ९फेब्रुवारीपासून सुरु झाल्या. तत्पूर्वी मीनाचे प्रशिक्षण ५ ते ८ फेब्रुवारी २०१९पर्यंत राष्ट्रीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धापूर्व प्रशिक्षण, विभागीय क्रीडा संकुल,हिरावाडी नाशिक येथे झाले. त्यानंतर ती गुजरात राज्यातील नडियाल येथे रवाना झाली. त्यात भालाफेक या क्रीडा प्रकारात १९ वर्षे वयोगट मुलींमधून सहभाग नोंदविला.१२ फेब्रुवारीला तिने प्रत्यक्ष स्पर्धेत भाग घेत ३५ मीटर भाला फेकून देशातून ९ वा क्रमांक पटकाविला.तिला क्रीडा शिक्षक विवेक दुबे यांचे मार्गदर्शन लाभले.
 प्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे, डॉ.  मंदाकिनी आमटे यांनी मीनाचे कौतुक केले.लोकबिरादरी प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे, लो.बि.आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समिक्षा आमटे यांनी मीनाचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.शाळेत एका कार्यक्रमात १५ फेब्रुवारीला तिचे स्वागत करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.याप्रसंगी मीनाने खेळात आलेले अनुभव कथन केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-02-15


Related Photos