महत्वाच्या बातम्या

 जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार  युवक/युवती, महिला यांना प्रशिक्षण सुविधेची संधी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : भारत सरकार ग्रामीण विकास मंत्रालय व बँक ऑफ इंडिया आरसेटी गडचिरोली यांचे विद्यमाने मत्स्यपालन ( उमेद अभियानातील मत्स्यसखी यांना प्राधान्य )   हे व्यवसायासाठी चे दहा दिवसाचे निवासी मोफत प्रशिक्षण संस्था कार्यालय (बीओआय-आरसेटी, कलेक्टर ऑफीस रोड, शासकीय दवाखान्या जवळ, गडचिरोली) येथे आयोजीत करण्यात येत आहे.   

 हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असून प्रशिक्षणादरम्यान राहणे, जेवण, चहा, नाश्ता या सोयी विनामुल्य पुरविल्या जातील.

प्रशिक्षणाचा कालावधी : १९ जुन २०२३ ते २८ जुन २०२३ राहिल.

प्रशिक्षणाची वेळ : सकाळी 9:30 ते साय. 5:30 वाजेपर्यंत

आवश्यक कागदपत्रे : ओरीजनल आधार कार्ड, पॅन कार्ड, टी सी/मार्कशिट, बीपीएल दाखला, स्वयंसहायता गटाचे सभासद असल्याचे प्रमाणपत्र, रोजगार हमी जाब कार्ड [असल्यास], पासपोर्ट आकाराचे ४ फोटो

अधिक माहितीसाठी संपर्क : बीओआय-आरसेटी जिल्हाधिकारी कार्यालय रोड, सरकारी दवाखान्यासमोर, कॉम्प्लेक्स, गडचिरोली 

संपर्क : 07132-295040

कार्यक्रम समन्वयक

हेमंत मेश्राम

9404188239





  Print






News - Gadchiroli




Related Photos