महत्वाच्या बातम्या

 केंद्र सरकारच्या ९ वर्षाच्या कार्यकाळात ग्रामीण भागाचा कायापालट : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : भारताचे लोकप्रीय प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पार्टीच्या सरकारला ०९ जल अंतर्गत पाणीपुरवठा होत आहे, पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन लोकसभाक्षेत्रात मोठया प्रमाणात ग्रामीण रस्त्यांची कामे सुरु आहे, प्रधानमंत्री सन्मान निधी च्या माध्यमातुन वार्षिक ६ हजार रुपये प्राप्त होत आहे, तसेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातुन ग्रामीण भागातील नागरिकांना घरे उपलब्ध आहे, केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातुन ग्रामीण भागात मोठा बदल दिसत आहे, असे यावेळी खासदार रामदास तडस म्हणाले.

फत्तेपूर येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना, २५१५/१२३८ अंतर्गत रस्त्याचे कामे, जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत स्मशानभूमी सौदर्यीकरण, १५ व्या वित आयोगातुन सार्वजनिक शौच्छालयाचे बांधकामाचे भुमीपूजन खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी माजी जि.प. सभापती मुकेश भिसे, राजेश बकाने, सरपंच जयश्री आत्राम, उपसरपंच ज्ञानेश्वर चौधरी, भाजपा तालुका अध्यक्ष दशरथ भुजाडे, माजी नगरसेवक रितेश लोखंडे, सचिव राम डाखोरे उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने ०६ जुन हा दिवस महाराष्ट्रातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयामध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येत आहे. त्यानुसार आज ग्रामपंचायत कार्यालय येथे शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे कार्यक्रमाला सदस्य रमेश मगरदे, सदस्या ज्योती लोखंडे, सदस्या पुष्मा शंभरकर, सदस्य अनिल चिडाम, सदस्या कोलापडे, प्रविण लोखंडे, धनराजजी राजुरकर, वामणराव मसराम, श्यामराव इंगळे, गणेश रोकडे, महादेवराव मसराम, दादाराव सावरकर, मनोहर तिखे, हनुमान उमरडकर, भिमराव मगरदे, विनोद कलादंरे, राजश्री कावडकर, चंदा राजुरकर, मसराम व मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos